नामकरण :
जन्मसमयीची ग्रहदशा व ज्योतिषशास्त्रीय परिस्थिती लक्षात घेऊन शुभ नाम शोधण्यासाठी ब्राह्मण पुरोहिताचा सल्ला घेतात. ह्या समारंभास प्रामुख्याने महिलांना आमंत्रण देतात. सर्व महिला बालकासाठी भेटवस्तू आणतात. ग्रॅनाईट दगडाच्या वरवंट्याला तेल लावून पाळण्यात ठेवतात. आपल्या अर्भाकास हातात घेऊन आई पाळण्याच्या एका बाजूला उभी राहाते आणि समोरच्या बाजूच्या महिलेस ” कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या ” असे म्हणते. समोरची महिला वरवंटा हातात घेते आणि मुलाला प्रथमच पाळण्यात घातले जाते. आई मुलाला द्यावयाचे शुभ नांव प्रथम त्याच्या कानात कुजबुजते आणी नंतर आमंत्रितांसमोर घोषित करते. सर्व महिला मग बालक झोपी जाण्यास्तव ‘पाळणा’ गीत म्हणतात. अभ्यागतांना अल्पोहार व घुगऱ्या दिल्यावर नामकरण विधी समाप्त होतो.
|
3D decoration |